क्रीडाप्रभाग समिती क्रं. १
मिरा-भाईंदर मॅरेथॉन: २१, १० व ५ किमी धाव आणि कुटुंब धाव
शहरातील सर्वात मोठी धाव. सर्व गटांसाठी नोंदणी विनामूल्य; पूर्ण करणाऱ्या सर्वांना पदक.
महापालिकेचा अधिकृत कार्यक्रम · शेवटचा बदल: १९ नोव्हेंबर २०२६
माहिती
धावेचा मार्ग नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापासून सुरू होऊन भाईंदर पश्चिमेतील मुख्य रस्त्यांवरून परत मैदानात संपेल. मार्गावर दर अडीच किलोमीटरवर पाणी व वैद्यकीय मदत केंद्र असेल.
धावेच्या दिवशी सकाळी ५ ते १० या वेळेत मार्गावरील वाहतूक वळवण्यात येईल.
आधी: तयारी
- कोणासाठी: सर्वांसाठी
त्या दिवशी
सकाळी ५:३० ते सकाळी ८:३०
२१ किमी अर्ध मॅरेथॉन
सकाळी ६:०० ते सकाळी ८:००
१० किमी धाव
सकाळी ६:३० ते सकाळी ७:४५
५ किमी धाव
सकाळी ७:०० ते सकाळी ८:००
३ किमी कुटुंब धाव
मुले, ज्येष्ठ व दिव्यांग धावपटूंसाठी; चालत पूर्ण केली तरी चालेल.
सकाळी ८:४५ ते सकाळी १०:००
बक्षीस वितरण
नंतर
कार्यक्रमानंतर छायाचित्रे शहर दैनंदिनीत आणि याच पानावर दिसतील. अभिप्राय याच पानावर देता येईल.
नेहमीचे प्रश्न
बिब क्रमांक कुठे मिळेल?
धावेच्या आदल्या दिवशी दुपारी २ ते रात्री ८ या वेळेत मैदानावरील नोंदणी कक्षात.
वयोमर्यादा आहे का?
२१ किमीसाठी किमान १८ वर्षे, १० किमीसाठी १६ वर्षे. कुटुंब धावेला वयोमर्यादा नाही.
नोंदणी
नोंदणीसाठी मदत हवी? टोल फ्री हेल्पलाइनवर कॉल करा: 1800 224 849
आयोजक
क्रीडा विभाग




